आपल्या आवडत्या गारवा ऍल्बम च्या एका क्लासिक गाण्याच्या कवितेपासुन प्रवृत्त होउन माहिती तंत्रद्न्यानातल्या कामगारांची ही गाथा:
मूळ कविता:
कवी: सौमित्र
ऊन जरा जास्त आहे, दर वर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेउन, आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही
घामा शिवाय शरीरा मध्ये कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठुन एक ढग सूर्या समोर येतो,
तितक्यात कुठुन एक ढग सूर्या समोर येतो,
उन्हा मधला काही भाग, पंखांखाली घेतो
वारा उनाड मुला सारखा, सैरा वैरा पळत राहतो
पाना फुला झाडांवरती, छपरावरती चढून पाहतो
दुपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ,
उन्हा मागून चालत येते, गार गार कातरवेल
चक्क डोळ्यांसमोर ऋतु कूस बदलून घेतो,
पावसा आधी ढगांमध्ये कुठुन गारवा येतो ?
(मूळ कवीची माफी मागुन) विडंबन:
काम जरा जास्त आहे, रोज ऑफिस मध्ये वाटतं
चाल ढकल करत करत, काम वाढत राहतं
जरी डेडलाईन फिक्स असते, तरी काळजी वाटत नाही
कारण आळसा शिवाय शरीरा मध्ये कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठुन एक ईमेल इन्बॉक्स मध्ये येतो,
तितक्यात कुठुन एक ईमेल इन्बॉक्स मध्ये येतो,
प्रोडक्टिव टाइम चा काही भाग, ईमेल वाचण्यात जातो
जिथून तिथून फॉर्वर्ड होउन, ईमेल नुसता फिरत राहतो
फायरवॉल स्पॅम ची बंधनं मोडत, इतरांचा वेळ खात राहतो
ईमेल नंतर सुरु होतो वेळ घालवण्याचा दुसरा खेळ,
चाहा कॉफी चा आस्वाद घेत, वाया जातो आपला वेळ
चक्कं डोळ्यांसमोर डेडलाईन मिस होताना पाहतो,
तरी चांगल्या अपरेझल ची आपण, कशी अपेक्शा ठेवतो ?
No comments:
Post a Comment